नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकरोड परिसरातील एकलहरेरोडवर असलेल्या अरिंगळे मळ्यात तेरा वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारीच राहणाऱ्या मुलांनी चाकूचा धाक दाखवत हा प्रकार केल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली आहे.
पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.०९) रात्री पिडीत मुलीचे आई-वडील मजुरीचे काम पूर्ण करून घरी परतल्यावर त्यांना मुलगी घरात आढळून आली नाही. तिचा शोध घेतला असता ती घराच्या गच्चीवर आढळून आली. ती घाबरलेल्या अवस्थेत होती. विचारपूस केली असता तिने आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेल्या प्रकारची माहिती दिली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशायीतांविरोधात गुन्हा नोंदवला. दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक खरात (वय १९. रा.सिन्नर फाटा), रवी कुऱ्हाडे (वय १९, रा. पांडवलेणी), आकाश गायकवाड (वय २४, रा. साईनाथनगर, एकलहरे रोड), सुनील कोले (वय २४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, जेलरोड), सोमनाथ खरात (वय १९, रा. गुलाबवाडी), आणि एक विधीसंघार्षित मुलगा अशी संशयितांची नावे आहेत.