नाशिक (प्रतिनिधी) : आनंदवली परिसरात दारू पिण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. म्हणून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
⚡ हे ही वाचा: नाशिक मनपाची मोठी कारवाई; नाशिकरोड, पंचवटी व सिडको परिसरातील ९५ ठिकाणी अतिक्रमण हटविले
मंगळवारी (दि.५ जानेवारी) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान, आनंदवली परिसरातील महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे २ मित्र मद्य प्राशन करत होते. दरम्यान, संशयित आरोपी रुपेश छोटूलाल यादव व मोहन विष्णू लाहिरे (वय २९, रा.चुंचाळे) या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संशयित रुपेशने मारहाण करत, मोहनला जमिनीवर खाली पाडले व दगड डोक्यात घालून त्याचा खून केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790