नाशिक (प्रतिनिधी): लॉकडाउनच्या काळात काही महिन्यांपासून मंदिरे बंद होती. यामुळे त्रंबकेश्वर येथील मंदिरसुद्धा बंद असल्याने नियमित वारी करणाऱ्या लोकांच्या वाऱ्या देखील बंद होत्या. परंतु आता दिवाळी पासून मंदिरे उघडले. व भाविक दर्शनासाठी गर्दी करू लागले. दर्शन एवढ्या दिवसांपासून सुरु झाले असले तरी मंदिर प्रशासनाकडून नियोजनाचा गोंधळ सुरूच आहे.
पोलीस व मंदिर प्रशासनामध्ये ताळमेळ नसल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागतो आहे. मंदिर खुले झाल्यापासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. येणाऱ्या भाविकांच्या गाड्या व्यवस्थित न लावल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्त्यांवर वस्तू विक्रीसाठी विक्रेते बसतात. त्यांच्यामुळे पायी चालणाऱ्यांना व स्थानिकांना देखील यांचा त्रास सहन करावा लागतो. दुपारी दर्शनासाठी येणारे भाविक व पूजाअर्चा करायला येणारे यांच्या वाहनांची रोज एकच गर्दी लागलेली असते. इतर दिवशी सुरक्षिततेचे नियम पळून रांगेतून होणारे दर्शन महत्वाचे दिवस व शनिवार रविवारच्या दिवशी हे सगळे नियम धाब्यावर बसवले जातात.