नाशिक (प्रतिनिधी) : अनलॉकअंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तर दुसऱ्या बाजूला चोरटे सक्रिय झाले असून, शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येते. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. तर चक्क २ ते ३ दिवसांपूर्वी चोरटयांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील हजारो रुपये किंमतीची तांब्याची तारच चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, प्रकरणासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.
शहरातील गडकरी चौकात विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील समर्पक हॉलच्या पाठीमागे अज्ञात चोरटयांनी ३१ हजार रुपयांची तांब्याची तार चोरून नेली. या घटनेनंतर पोलीस हवालदार अर्जुन खेलूकर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.