Amazon

नाशिक: निवृत्तीवेतनधारकांसाठी स्मार्टफोनवरून हयातीचा दाखला सादर करण्याची डिजिटल सुविधा

नाशिक। दि. १४ नोव्हेंबर २०२६: राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आता कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नाही. डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Digital Life Certificate) स्मार्टफोनच्या माध्यमातून घरबसल्या तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेचा लाभ घेऊन निवृत्तीवेतनधारकांनी आपला हयातीचा दाखला डिजिटल पद्धतीने सादर करावा. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत विभागातील सर्व कोषागोर कार्यालय व बँकांमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या DLC शिबिरांचा निवृत्तीवेतन धारकांनी सहभागी होवून AadhaarFaceRD व Jeevan Pramaan ॲपद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करून घ्यावे, असे आवाहन लेखा व कोषागारे, नाशिक विभागाचे सहसंचालक बाबुलाल पाटील यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महसूल सेवक (कोतवाल) पदभरती परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी !

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करावा लागतो. यासाठी केंद्र शासनाच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधेअंतर्गत आधार आधारित चेहरा पडताळणी, बोटांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुबुळांच्या आधारे ओळख पडताळणी करून प्रमाणपत्र तयार करता येते. प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर संबंधित निवृत्तीवेतनधारकाच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे Pramaan ID प्राप्त होतो. या आयडीच्या माध्यमातून प्रमाणपत्राची डाउनलोड लिंक उपलब्ध होते. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष प्रमाणपत्र जमा करण्याची आवश्यकता राहत नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' मतदारांना पुन्हा संधी; वाचा सविस्तर...

डिजिटल प्रमाणपत्रासाठी आवश्यक बाबी:
डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी Android 9.0 किंवा त्यावरील आवृत्तीचा स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा, किमान 5 MP क्षमतेचा कॅमेरा तसेच AadhaarFaceRD आणि Jeevan Pramaan हे ॲप आवश्यक आहेत.

अशी आहे प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया:
सर्वप्रथम Google Play Store वरून AadhaarFaceRD ॲप इन्स्टॉल करावे. त्यानंतर Jeevan Pramaan ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे. आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक व ई-मेलच्या माध्यमातून ऑपरेटर नोंदणी करावी. त्यानंतर निवृत्तीवेतनधारकाची आवश्यक माहिती भरून आधार आधारित चेहरा किंवा बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करावी. यशस्वी पडताळणीनंतर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790