Amazon

सीबीएसई बोर्ड १०वी, १२ वी परीक्षा १६ फेब्रुवारीपासून

मुंबई। दि. ७ नोव्हेंबर २०२६: सीबीएसईने शुक्रवारी १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा २०२७ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही वर्गांच्या परीक्षा १६ फेब्रुवारीपासून सुरू होतील. १० वीची मुख्य परीक्षा ९ मार्चपर्यंत चालेल. तसेच १२ वीची परीक्षा ९ एप्रिलपर्यंत असेल. सर्व पेपर सकाळी १०:३० वाजता सुरू होतील. बोडर्डाने परीक्षेच्या १०९ दिवस आधी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वर्षी १० वीसाठी २६.५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. १२ वीसाठी १९.८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'या' ठिकाणी उभारणार ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन; ९९.९९ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता

१० वीचा पहिला पेपर १६ फेब्रुवारीला पेंटिंगचा असेल. गणिताचा पेपर १७ फेब्रुवारी आणि विज्ञानाचा पेपर २२ फेब्रुवारीला होईल. इंग्रजी २६ फेब्रुवारी, हिंदी ३ मार्च आणि समाजशास्त्राचा पेपर ८ मार्चला होईल. शेवटच्या दिवशी ९ मार्चला तिबेटी, जर्मन, एनसीसीसह अनेक विषयांचे पेपर असतील.

🔎 हे वाचलं का?:  महावितरणची ‘अभय योजना’ जाहीर! थकित वीजबिलांवरील व्याज-दंड १००% माफ; मूळ रकमेतही २०% पर्यंत सूट

बारावीचा पहिलाच पेपर असेल भौतिकशास्त्राचा:
दुसरीकडे, १२ वीचा पहिला पेपर १६ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा असेल. अकाउंटन्सी २३ फेब्रुवारी आणि रसायनशास्त्राचा पेपर २७ फेब्रुवारीला होईल. इंग्रजी ५ मार्च, गणित ९ मार्च आणि जीवशास्त्राचा पेपर २५ मार्चला असेल. शेवटच्या दिवशी ९ एप्रिलला रिटेल आणि वेब अॅप्लिकेशनचे पेपर असतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790