Amazon

नाशिक: दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘श्री वर्धमान गोल्ड अँड डायमंड्स’मध्ये ग्राहकांची गर्दी; ऑफरला नाशिककरांचा प्रतिसाद !

नाशिक। दि. २० ऑक्टोबर २०२६: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सोने-चांदीच्या खरेदीसाठी नाशिकमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गंगापूर रोडवरील ठत्तेनगर कॉर्नर येथील श्री वर्धमान गोल्ड अँड डायमंड्स या दालनात दसऱ्यानिमित्त ग्राहकांनी गर्दी केली होती. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या आकर्षक सवलतींच्या ऑफरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दसरा आणि दिवाळीच्या सणांमध्ये सोने-हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते. हीच संधी साधत श्री वर्धमान गोल्ड अँड डायमंड्सने ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ४० टक्के, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर तब्बल ८० टक्के सवलत दिली जात आहे.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दागिन्यांची खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येत असून, दिवाळीच्या खरेदीसाठीही ही योजना उपयुक्त ठरणार आहे. स्वतःसाठी दागिने खरेदी करण्यासोबतच सणासुदीच्या भेटवस्तू आणि खास प्रसंगांसाठी दागिने घेणाऱ्या ग्राहकांसाठीही ही ऑफर आकर्षण ठरत आहे.

ही विशेष ऑफर ११ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर दिवाळीपर्यंत ग्राहकांना सवलतीत दागिने खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे.

दागिन्यांच्या खरेदीसाठी येथे साधा संपर्क
श्री वर्धमान गोल्ड अँड डायमंड्स, दुसरा मजला, श्री गणेश कुबेर, गंगापूर रोड, ठत्तेनगर कॉर्नर, नाशिक येथे हे दालन आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक 025323131212 किंवा 9168668916 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790