Amazon

नाशिक: ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’च्या जनजागृती सत्राचे २१ ऑक्टोबर रोजी आयोजन

नाशिक। दि. २० ऑक्टोबर २०२६: सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या (MSInS) वतीने बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, केबीटी सर्कलजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी या सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि. रा. रिसे यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या आयोजनासाठी स्थानिक स्तरावर सह्याद्री फार्म्स या संस्थेचे सहकार्य लाभणार आहे. या सत्रात ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी आणि सहभागी होण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित भागधारकांशी संवाद साधणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘मी या एरियाचा भाई आहे’ म्हणत दोघांना दांडक्याने मारहाण; नागचौकात दहशत

जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक तसेच संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवावी आणि जनजागृती सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790