Amazon

नाशिक: शहरातील ‘या’ वाहतूक मार्गांत आज (दि. २०) महत्वाचे बदल…

नाशिक। दि. २० ऑक्टोबर २०२६: विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. २०) रामकुंड परिसरात होणारा रामलीला आणि रावण दहनाचा कार्यक्रम तसेच देवी मूर्ती विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने वाहतुकीत बदल केले आहेत. मालेगाव स्टँड, रामकुंड, सरकारवाडा चौक आणि महाराणा प्रताप पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

दरवर्षी विजयादशमीला सालाबादप्रमाणे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यानिमित्ताने भीमसेनेची मिरवणूक, रामलीला आणि रावण दहनाचा कार्यक्रम होतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'अमृत' तर्फे दुर्गोत्सव 2026 चे आयोजन

मालेगाव स्टँड, मालवीय चौक, सीतागुंफा रोड, श्री काळाराम मंदिर, सरकारवाडा चौक आणि साईबाबा मंदिरमार्गे रामगंगा पार्किंग परिसरात रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानंतर रावण दहन होते. या कार्यक्रमाला सुमारे नऊ ते दहा हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच काळात परिसरात देवी मूर्ती विसर्जनासाठीही मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे रामकुंड परिसरात गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: CSR निधीतून ४० गावांत विकासकामांचे आमिष; ४.२० लाखांची फसवणूक

प्रवेश बंद मार्ग असा:
मालेगाव स्टैंडकडून रामकुंड, सरदार चौकमार्गे गाडगे महाराज पुलाकडे जाणाऱ्या तसेच गाडगे महाराज पुलाकडून सरदार चौक, रामकुंडमार्गे मालेगाव स्टँडकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग असा:
या मार्गावरील वाहनांनी मालेगाव स्टैंड, पंचवटी कारंजा, निमाणी बसस्थानक, काट्या मारुती चौक आणि गणेशवाडी मार्गाचा वापर करावा. तसेच वाहनचालकांनी गर्दीची ठिकाणे टाळून इतर उपलब्ध पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरात विजयादशमीचा उत्साह; नाशिकमध्ये आज पाच ठिकाणी रावणदहन

शहर वाहतूक शाखेने वाहनचालकांनी संबंधित मार्गावरील निर्बंधांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. वाहतूक परिस्थितीनुसार निर्बंधांमध्ये ऐनवेळी बदल करण्याचे अधिकार पोलिसांनी राखून ठेवले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790