Amazon

नाशिक: गोदावरी नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन

नाशिक। दि. ९ जुलै २०२६: नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाले भरुन वाहत आहेत. गोदावरी नदीसह जिल्ह्यातील विविध नद्यांच्या काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

मंत्री श्री. महाजन यांनी आज दुपारी शहरातील रामकुंड परिसरास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वन्यजीव सप्ताहानिमित्त नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात निसर्ग निर्वाचन केंद्र व तिकीट घराचे उद्घाटन

मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे गोदावरी नदी पात्रातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास त्यात टप्प्या- टप्प्याने वाढ करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये किंवा जनावरे नेऊ नयेत. शेतीपयोगी साहित्य सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करावे. तसेच नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी पावसाळी पर्यटन टाळावे, असेही आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले. महापौर श्रीमती आडके आहेर, आयुक्त श्रीमती खत्री यांनी गोदावरी नदी पूर नियंत्रणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790