नाशिक (प्रतिनिधी) : पोलिसांकडून राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये बॅगा चोरणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीतील टोळीस इंदूर येथे ७ जणांना ताब्यात घेण्यात आले. या टोळीकडून इनोव्हा कार तसेच १० लाख रोक्कड हस्तगत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांगत्रम सैली दुराई, पवन मोहनलाल, आकाश मोहनलाल, मनतोश अली मुत्तू, मरियप्पा काली बाबू, विनोद राजेंद्र, साहिल सुरेश व त्यांचा अल्पवयीन साथीदार सर्व संशयित आरोपी असून, दिल्लीचे रहिवाशी आहेत. रामचंद्र नामदेव जाधव (रा.बोधलेनगर, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.५) रोजी चारचाकीतून महात्मा गांधी रोड परिसरात होते. दरम्यान त्यांना एका इसमाने गाडीतून ऑइल गळत आहे.असे सांगितले. सुरुवातीला जाधव यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र परत दुसऱ्या व्यक्तीनेही गाडीचे ऑइल पडत असल्याचे सांगितले. जाधव कारच्या खाली उतरून तपासणी करत असताना, भामट्यानी गाडीत मागच्या सीटवर ठेवलेल्या २ बॅगा लंपास केल्या.
एका बॅगेत १ लाखाची रोक्कड होती. याप्रकरणी जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तरी सदर प्रकरणाच्या तपासणी दरम्यान शहर पोलिसांच्या शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथक व सरकारवाडा पोलीस पथकाला टोळीतील आरोपी दिल्लीचे रहिवाशी असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पथकाला माहिती मिळाली की, टोळी १ तारखेला मध्य प्रदेश येथील इंदोर शहरात रवाना झाली. तरी पथकाने आपला मोर्चा त्या दिशेने वळवत शहरातील हॉटेल्स, लॉज इत्यादी बघितले.
मात्र संशयित हाती लागले नाही. पण परत येत असताना पोलिसांनी प्रीतमपूर गावाजवळील ‘द ग्रीन ऍपल हॉटेल जवळ संशयितांची इनोव्हा कार (एचआर २६ बीआर ९०४४) व संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांकडून इनोव्हा, सात मोबाईल, मिरची लिक्विड, गलोर, छर्रे व ७० हजारांची रोक्कड पोलिसांनी जप्त केली. सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र, गुजरात,राज्यस्थान, व दिल्ली येथे गुन्ह्याची नोंद आहे. तर पुणे, मुंबई, नाशिक ठाणे, सुरत, इंदूर व अह्मदाबादमध्येही गुन्हे केल्याची कबुली टोळीकडून करण्यात आली. सदर टोळीस सोमवार (दि.०९) नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.