नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकचे नाव केवळ एका क्रमांकाने देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरांच्या यादीत येणाची संधी हुकली. त्यामुळे येणाऱ्या २०२१ या वर्षी जानेवारीमध्ये स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचे नाव येण्यासाठी शहराचे आयुक्त कैलास जाधव यांनी नवीन शक्कल लावली असून, शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छेतेविषयक जागृती करण्याचे ठरवले आहे.
महापालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल्स, शाळा, रुग्णायले, रहिवाशी संकुले,शासकीय संस्था व बाजारपेठेसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून १ ते २५ नोव्हेंबर दरम्यान नोडल अधिकारी, विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक यांच्यातर्फे आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. स्वच्छ शहर स्पर्धेच्या पार्शभूमीवर दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये केंद्र शासनाचे पथक पाहणीसाठी अनेक शहरांमध्ये जात असतात. त्यामुळे केवळ २ महिने शिल्लक असल्याने या स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील परिसर स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या हॉटेल्स, शाळा,हॉस्पिटल्स, रहिवाशी संकुल, शासकीय संस्था इत्यादींचे आस्थापन करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. प्रथम, व्दितीय, तृतीय, असे क्रमांक जाहीर करून, विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. स्पर्धा ही १०० गुणांसाठी असणार असून, पायाभूत सेवा व सुविधांसाठी ९० गुण, कोवीड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्यास,वृक्षारोपण परिसर स्वच्छता इत्यादींसाठी ९० गुण तसेच ग्राहक, रुग्ण, विक्रेते कर्मचारी, व्यावसायिक इत्यादीनाच्या प्रतिसादाला १० गुण.