नाशिक: गोदावरी जन्मोत्सवानिमित्त आज (दि. ३१) शहरातील ‘या’ वाहतूक मार्गात बदल

नाशिक। दि. ३१ जानेवारी २०२६: रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे गोदावरी जन्मोत्सवाचे आयोजन शनिवारी (दि. ३१) करण्यात आले आहे. विविध मान्यवरांसह नाशिककरांची कार्यक्रमासाठी होणारी गर्दी पाहता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दुपारी तीन वाजेपासून कार्यक्रम संपेस्तोवर वाहतूक मार्गातील बदल असेल. याशिवाय स्वतंत्र पार्किंगची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजेपासून मुख्य कार्यक्रम सुरू होतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गरवारे ते एक्स्लो पॉइंट वाहतूक मार्गात बदल !

येथे प्रवेश बंद:
मालेगाव स्टैंडकडून रामकुंड ते पुढे म्हसोबा पटांगणाकडे जाणारा व येणारा रस्ता, ढिकले वाचनालयाकडून रामकुंड ते पुढे म्हसोबा पटांगणाकडे जाणारा व येणारा रस्ता, खांदवे सभागृहाकडून रामकुंडाकडे जाणारा व येणारा रस्ता.

पर्यायी मार्ग:
मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा-दिंडोरी नाका-काट्या मारुती गणेश वाडी-पंचवटी अमरधाम पटांगण तसेच आडगाव नाका कन्नमवार पुलाखालून पंचवटी अमरधाम पटांगण-गौरी पटांगण, द्वारका-बागवानपुरा चौकी नाशिक अमरधाम-रोकडोबा मैदान, द्वारका-ट्रॅक्टर हाऊस-नाशिक अमरधाम-रोकडोबा मैदान तसेच द्वारका येथून ट्रॅक्टर हाऊस, कन्नमवार पूल, नाशिक अमरधाम मैदान-रोकडोबा. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रेल्वे लेव्हल क्रॉसिंग व्यवस्थापनासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून संयुक्त सर्वेक्षणांना सुरुवात

वाहनतळ (पार्किंग व्यवस्था):
व्हीआयपी यांच्याकरिता गंगाघाटावरील भाजीबाजार मैदान
कपूरथळा डोम : ११११ आरतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी पार्किंग व्यवस्था
इतर सर्व नागरिकांकरिता गौरी पटांगण व रोकडोबा मैदान

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790