नाशिक: कोण होणार महापौर ? दिपाली गीतेंच्या नावाची जोरदार चर्चा !

नाशिकच्या राजकीय क्षितिजावर सध्या एका नावाची जोरदार चर्चा आहे, ते म्हणजे सौ. दिपाली गीते. केवळ एक राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातील महिला म्हणून नव्हे, तर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेल्या ‘कर्तृत्ववान महिला’ म्हणून त्या नाशिककरांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रभाग क्रमांक १ मधून सर्वाधिक मताधिक्याने नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून, महापौरपदाच्या त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

निर्भय ती… निर्धार तिचा !:
दिपाली ताईंचे व्यक्तिमत्व हे ‘निर्भय ती… निर्धार तिचा’ या वाक्यात तंतोतंत बसते. समाजकारण आणि राजकारण यांचा योग्य मेळ घालण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. ‘दि विजय अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी’च्या त्या चेअरमन असून सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका म्हणून त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची चुणूक यापूर्वीच दाखवून दिली आहे. महिला सक्षमीकरणासाठी केवळ भाषणे न देता, प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गरवारे ते एक्स्लो पॉइंट वाहतूक मार्गात बदल !

विकासाचा अखंडित प्रवास:
‘विकासाचा नवा चेहरा’ म्हणून समोर येत असताना, त्यांच्यामागे भक्कम विकासकामांची शिदोरी आहे. त्यांच्या व्हिजनमध्ये नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा स्पष्ट दिसतो.

पायाभूत सुविधा : पेठ रोड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमचे काम असो किंवा २० लक्ष लिटर क्षमतेची जलकुंभ निर्मिती, नाशिककरांच्या मूलभूत गरजांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. पेठ रोड रस्ता काँक्रीटीकरण आणि ‘सिटी लिंक बस सेवा’ सुरू करण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे.

शिक्षण आणि आरोग्य: ७०० हून अधिक आसन व्यवस्था असणारी उत्तर महाराष्ट्रातील पहिली ई लर्निंग अभ्यासिका दिंडोरी रोड येथे उभारून त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची सोय केली आहे. तसेच प्रभागामध्ये विविध ठिकाणी ‘ग्रीन जीम’ उभारून आरोग्याप्रति जागरूकता निर्माण केली आहे.

सेवा हाच धर्म, विकास हेच ध्येय:
केवळ रस्ते आणि इमारती म्हणजे विकास नव्हे, तर तळागाळातील माणसाची सेवा करणे हे दिपाली गीते यांचे वैशिष्ट्य आहे. ‘स्वर्गीय हरिभाऊ गिते फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवन वृक्षतोड प्रकरणी १७ फेब्रुवारीला सुनावणी, मनपाने लेखी हमी देण्याची मागणी

👉 आरोग्य सेवा: मोफत रुग्णवाहिका, ना नफा ना तोटा या तत्त्वावर पॅथॉलॉजी लॅब आणि डास निर्मूलनासाठी मोफत धूर फवारणी यांसारख्या उपक्रमांमधून त्यांनी आरोग्याची काळजी घेतली आहे.

👉 महिला सक्षमीकरण: गरजू महिलांना ‘मोफत शिलाई मशीन वाटप’ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून बळ दिले आहे.

👉 सामाजिक कार्य: कोरोना काळात गरजूंना मदत असो किंवा गणेशोत्सवात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ‘गणेश मूर्ती संकलन’ आणि ‘निर्माल्य संकलन’ मोहीम, त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. दुःखद प्रसंगी आधार देण्यासाठी ‘मोफत वैकुंठरथ सेवा’ देखील त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

अविरत सेवा, संकल्प : स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य सुरू असून त्या माध्यमातून मोफत अविरत सेवांचा संकल्प जपला जात आहे. यात मोफत पाणी टँकर, ना नफा ना तोटा या तत्त्वावर पॅथॉलॉजी लॅब, प्रभागात होणारा मच्छरांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी वेळोवेळी मोफत मच्छर धूर फवारणी, झाडांचा पालापाचोळा संकलन करून प्रभागातील उद्यानासाठी त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती व वैकुंठ रथ या सेवांचा समावेश आहे. या सर्व सेवा गेल्या अनेक वर्षापासून अविरत मोफत सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  हुतात्मा दिन; शासकीय कार्यालयांत आज ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळणार

व्हिजन : “मी तुम्हाला शब्द देते…” असे म्हणत जेव्हा सौ. दिपाली गीते जनतेसमोर जातात, तेव्हा त्यांच्या शब्दाला कामाची आणि विश्वासाची जोड असते. एक सुशिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक भान असलेली महिला महापौर नाशिकला लाभली, तर शहराचा कायापालट निश्चित आहे, असा विश्वास जनमानसात निर्माण झाला आहे.

लीड क्वीन : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना १६,६४२ इतकी विक्रमी मते मिळाली असून ११,३१५ इतक्या विक्रमी मतांनी विजयी होत. शहरात महिलांमध्ये सर्वाधिक मताधिक्य त्यांना प्राप्त झाले आहे.

नाशिकला स्मार्ट सिटी बनवत असताना, ती ‘संवेदनशील सिटी’ बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून सौ. दिपाली गीते यांची वाटचाल सुरू आहे. त्यांचा हा प्रवास नाशिकच्या विकासाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास नाशिककरांना वाटतो !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790