नाशिक शहरातील ‘या’ महत्वाच्या वाहतूक मार्गात शुक्रवारपासून बदल !

नाशिक। दि. २९ जानेवारी २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल येथे अंडरपासच्या बांधकामाला सुरुवात होत असून, या कामानिमित्त शहराच्या वाहतूक व्यवस्थेत शुक्रवार (दि. ३०) पासून मोठे बदल करण्यात आले आहेत. अंडरपासच्या कामकाजादरम्यान सर्व जड-अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एस.टी. तसेच सिटीलिंक बसेस यांना द्वारका चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

ही वाहतूकबंदी ३० जानेवारी २०२६ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत, प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने लागू राहणार आहे. नाशिकहून नाशिकरोडकडे जाताना द्वारका चौकात ८०० मीटर लांबीचा अंडरपास तयार केला जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  हुतात्मा दिन; शासकीय कार्यालयांत आज ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळणार

🚚 जड वाहनांना प्रवेशबंदी:
द्वारका चौक परिसरात सर्व जड-अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एस.टी. व सिटीलिंक बसेसना प्रवेश बंद, जड वाहनांना फक्त रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत पर्यायी मार्गान प्रवासाची परवानगी.

⤴️ जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग:
नाशिक-मुंबई :
सिन्नर फाटा-दत्तमंदिर सिग्नल-फेम सिग्नल-रविशंकर मार्ग-वडाळागाव सर्कल – पाथर्डी फाटा-गरवारे पॉइंट-एनएच-३
नाशिक-सिन्नर : पाथर्डी फाटा-पाथर्डीगाव-साईनाथनगर सिग्नल-वडाळागाव-रहमतनगर-फेम सिग्नल-पुणे रोडमार्गे सिन्नर

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गरवारे ते एक्स्लो पॉइंट वाहतूक मार्गात बदल !

🚌 एस.टी. साठी नियोजन:
नाशिकरोड-मुंबई :
सिन्नर फाटा-दत्तमंदिर सिग्नल-संत सावता माळी मार्ग-जॉगिंग ट्रॅक-मुंबईनाका मार्गे पाथर्डी फाटा
नाशिक-सिन्नर : महामार्ग बसस्थानक – इंदिरानगर बोगदा – जॉगिंग ट्रॅक-साईनाथनगर सिग्नल- वडाळागाव-सम्राट सिग्नल-पुणे रोड

🚌 पुणे-नाशिक-त्र्यंबकेश्वर एस.टी. बसेस:
सिन्नर फाटा-दत्तमंदिर-डीजीपी नगर-लेखानगर-इंदिरानगर बोगदा-उंटवाडी रोड-ठक्कर बाजार/मेळा स्टँड.
ठक्कर बाजार-मोडक सिग्नल-मुंबईनाका-रविशंकर मार्ग-सिन्नर फाटा-पुणे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवन वृक्षतोड प्रकरणी १७ फेब्रुवारीला सुनावणी, मनपाने लेखी हमी देण्याची मागणी

🚌 निमाणी बसस्थानक मार्ग बदल:
मुंबई-धुळे :
गरवारे टी पॉइंट-इंदिरानगर-महात्मानगर-दिंडोरी नाका-निमाणी बस स्टँड
पुणे-धुळे/मालेगाव: सिन्नर फाटा-जेल रोड-नांदुरनाका-निमाणी बसस्थानक

🚌 सिटीलिंक बसेससाठी बदल:
शालिमार-नाशिकरोड :
खडकाळी-सारडा सर्कल-मदिना चौक-वडाळा नाका-फेम सिग्नल
नाशिकरोड-शालिमार : फेम सिग्नल-मुंबईनाका-मदिना चौक-सारडा सर्कल
सर्व सिटीलिंक बसेस तपोवन सिटीलिंक टर्मिनल येथून सुटणार

🚗 हलक्या वाहनांसाठी:
पुणे-मुंबई :
सिन्नर फाटा-वडनेर गेट पाथर्डी फाटा-गरवारे
पुणे-त्र्यंबकेश्वर : सिन्नर फाटा-अंबड-एक्सलो पॉइंट
मुंबईनाका-नाशिकरोड : भाभानगर-काठेगल्ली, नाशिकरोड-पंचवटी : फेम सिग्नल-ट्रॅक्टर हाऊस.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790