
नाशिक। दि. १९ डिसेंबर २०२५: अपोलो हॉस्पिटल्स नाशिकने अत्याधुनिक उपचारात आणखी एक मोठी झेप घेत नाशिकमधील पहिली ‘ट्रान्स-एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (TAVI) प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णाला या प्रक्रियेमुळे नवजीवन मिळाले आहे.
मूळचे शहादा येथील निवृत्त शिक्षक श्री जैसवाल (वय ६६) हे अनेक वर्षांपासून दुर्मिळ जन्मजात हृदयविकार (बायकसपिड एऑर्टिक व्हॉल्व्ह) ,किडनी फेल्युअर आणि त्यामुळे त्यांचे नियमित डायलिसिस सुरु होते तसेच ९ वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली होती ,या सर्व आजारांमुळे त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता केवळ २५% होती आणि त्यातही त्यांच्या हृदयाच्या डाव्या रक्तवाहिनीत (LAD) ९०% व LCX ८०–९०% ब्लॉकेज होते आणि यासर्व आजारांमुळे गेल्या ६ महिन्यात दोनदा तीव्र न्यूमोनायटिस देखील झाला होता इतक्या सर्व आजारांमुळे त्यांची ओपन-हार्ट सर्जरी करणे शक्य नव्हते, आणि भूल देणे सुद्धा धोकादायक होते त्यामुळे श्री.जैस्वाल यांची शस्रक्रिया करणे अशक्यच होते.
जैस्वाल याना झडपेचा त्रास बघता अपोलो हॉस्पिटल्स मधील डॉक्टरांच्या टीमने रुग्णाला भूल न देता, म्हणजेच Awake TAVI करण्याचा निर्णय घेतला, ज्या मध्ये रुग्णाला संपूर्ण शरीराला भूल न देता फक्त हृदय जवळच भूल देऊन सदर प्रक्रिया करण्यात येते , त्याच बरोबर हृदयातील रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी LAD व LCX या दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये दोन स्टेंटसह अँजिओप्लास्टीही करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना सुरळीतपणे झाली. हि प्रक्रिया करणे अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जोखमीच काम असतं. या प्रक्रियेनंतर हृदयाची कार्यक्षमता त्वरित सुधारू लागली, दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतः चालू लागला, श्वाशोच्छवास, ताकद आणि दैनंदिन हालचालींमध्ये लवकरच सुधारणा दिसली जी कि खूपच समाधानकारक होती.
या संपूर्ण प्रक्रियेत हृदयविकार तज्ञ डॉ. भूषण टिळे , अहमदाबाद येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.अभिषेक राजपोपट , किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. प्रकाश उगले , हृदय शस्रक्रिया तज्ञ डॉ.अभय सिंग वालिया , डॉ.अजहर सैयद , हृदय शस्रक्रिया भूल तज्ञ डॉ.भूपेश पराते, कॅथलॅब तंत्रज्ञ आणि नर्सिंग स्टाफ या सर्वांचे योगदान आहे.
रुग्णाच्या कुटुंबियांनी भावूक होत सांगितले, “अपोलो मधील अनुभवी आणि कुशल डॉक्टर , उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुसज्ज इन्फ्रास्टक्चर तसेच कुशल नर्सिंग स्टाफ या सगळ्यांमुळे आमच्या वडिलांना दुसरे आयुष्य मिळाले आहे आम्ही संपूर्ण अपोलो टीमचे मनःपूर्वक आभार मानतो !
अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे सीओओ श्री. दीपतेंदु पांडा म्हणाले कि “हे यश नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी अत्याधुनिक हृदयसेवेचा नवा अध्याय आहे, डॉक्टरांच्या टीमने केलेल्या या अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जोखमीच्या या प्रक्रिया खूप अवघड आणि गुंतागुंतीच्या असतात, मी या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि या पुढेही अशा क्रिटिकल रुग्णांना नवीन आयुष्य देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू “.
![]()

