नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.०५) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६९ हजार १७१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ९ हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ४३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६०६, चांदवड २०२, सिन्नर ८५८, दिंडोरी २६०, निफाड ११६३, देवळा १५७, नांदगांव ३३०, येवला १२३, त्र्यंबकेश्वर १६३, सुरगाणा ३८, पेठ ३५, कळवण १७१, बागलाण २६२, इगतपुरी २२८, मालेगांव ग्रामीण ३३८ असे एकूण ४ हजार ९३४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ०५२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४११ तर जिल्ह्याबाहेरील १११ असे एकूण ९ हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ८० हजार ११६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७५.२९, टक्के, नाशिक शहरात ९०.०५ टक्के, मालेगाव मध्ये ८५.१६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७३.७५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८६.३४ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४८४, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ७६४ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १५८ व जिल्हा बाहेरील ३१ अशा एकूण १ हजार ४३७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
(वरील आकडेवारी आज (दि.०५) सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)