🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: भरधाव वाहनाची धडक: ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू, वाहनचालक पसार

नाशिक, दि. ३१ जुलै २०२५: मखमलाबाद नाका परिसरात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला. ही घटना जलाराम स्वीट्सजवळ सोमवारी (दि. २८ जुलै) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, वाहनचालक फरार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित

मृत महिलेचे नाव जिजाबाई कांतीलाल भागवत (वय ६५, रा. विठाई हॉस्पिटलजवळ, मखमलाबाद नाका) असे आहे. त्या सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. पायी चालत असताना जलाराम स्वीट्ससमोर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

या घटनेनंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. हवालदार नवनाथ रोकडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३७३/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790