नाशिक (प्रतिनिधी) : व्यवसिकांच्या दृष्टीकोनातून पार्सलसाठी विशेष पार्सल गाडी मध्ये १२० दिवस अगोदर पार्सलचे आरक्षण बुकिंग करण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. व्यावसायिक व्यापाऱ्यांना पार्सल पाठवण्यासाठी १२० दिवस अगोदर आरक्षण करून स्थान निश्चित करावे लागणार आहे . पार्सल भाड्याच्या १०% रक्कम द्यावी लागणार आहे. आणि उर्वरित ९०% रक्कम पार्सल भाडे गाडीच्या सुटण्याच्या ७२ तास अगोदर भरावे लागणार आहे. जर पार्सल गाडी सुटण्याच्या अगोदर उर्वरित रक्कम दिली नाही तर बुकिंग रद्द करून भरलेली १०% रक्कम रेल्वे कडून जप्त करण्यात येईल
आरक्षण केलेली जागा रद्द करायची असेल तर गाडी सुटण्या अगोदर ७२ तासात रद्द करता येईल आणि भरलेल्या रकमेच्या ५०% रक्कम परत मिळेल ७२ तास नंतर जागा आरक्षित केलेल्या ग्राहकाला असे करता येणार नाही. काही कारणाने जर रेल्वे प्रशासना कडून पार्सल गाडी रद्द करण्यात आली तर जागा आरक्षित केलेल्या ग्राहकाला पूर्ण रक्कम परत करण्यात येईल.