नाशिक। दि. २८ जून २०२५: भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवती ठार झाली. तर तिचे वडील गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी ७ वाजता टाकळी मार्गावर हा अपघात घडला. ऋषिका आनंद चांदवले (वय: २३, राहणार: रामदास स्वामी नगर, टाकळी रोड, नाशिक) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनंद चांदवले हे मुलगी ऋषिका हिस दुचाकीवर पाठीमागे बसवून टाकळीमार्गे नाशिकरोडकडे जात असताना टाकळी मार्गावर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच १४ एचयू ८४०७) धडक दिली. यात ऋषिका खाली पडून जागीच ठार झाली तर तिचे वडील गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित मद्य प्राशन केलेला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790