नाशिक (प्रतिनिधी): राज्यात तापमानात लक्षणीय वाढ झालेली असतानाच हवामान विभागाने काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये १ ते ४ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सोमवारी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यासह बीड, जालना, धाराशिवसह खान्देश आणि विदर्भातील काही जिल्ह्यात हलका पाऊस झाला. मात्र दुपारी विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये तापमान ४० पेक्षाही अधिक होते. सर्वाधिक ४२.२ तापमानाची ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे नोंद झाली. एप्रिल- मेमध्ये उकाडा आणखीनच वाढण्याची शक्यता असतानाच हवामान विभागाने १ एप्रिल ते ४ एप्रिल २०२५ दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील.
यलो अलर्ट: १ ते ४ एप्रिल नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी.
![]()


