Traffic Alert: नाशिक शहरातील ‘या’ वाहतूक मार्गात उद्या (दि. ३० मार्च) महत्वाचे बदल !

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर गावात गुढीपाडवा यात्रोत्सव समितीतर्फे बारागाड्या ओढण्याचा कार्यकम तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सातपूर गाव परिसरातील वाहतूक मार्गात रविवारी (दि. ३०) दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत पोलिसांकडून बदल करण्यात आले आहेत. नागरिकांसह औद्योगिक वसाहतीशी संबंधित वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

या मार्गावर प्रवेश बंद:
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सकाळ सर्कल ते महिंद्रा सर्कल या मार्गावरून दोन्ही बाजूने येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

पर्यायी मार्ग असे:
नाशिककडून त्र्यंबककडे जाणारी सर्व वाहतूक सकाळ सर्कल, अचानक सर्कल, गंगामाई सोसायटीसमोरील स्वराज्य चौक, नाशिक ऑक्सिजन कंपनीसमोरील चौक, जलतरण तलावसमोरून पंढरीनाथ गांगुर्डे चौक मार्गाने इतरत्र जातील.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारी सर्व वाहतूक पंढरीनाथ गांगुर्डे चौक-नाशिक ऑक्सिजन कंपनीसमोरील चौक, जलतरण तलावसमोरून गंगामाई सोसायटी, पुढे स्वराज्य चौक-अचानक सर्कल मागनि इतरत्र जातील.

हे निर्बंध पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहनांना लागू नसतील.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here