नाशिक( प्रतिनिधी) : अंबड एमआयडीसीत असलेले मोकळे मैदान आणि परिसरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यालगत ठीक ठिकाणावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. संपूर्ण परिसरात आरोग्य विभागच्या दुर्लक्षतेमुळे अस्वच्छतेचे साम्राज निर्माण झाले आहे. महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उद्योजक त्रस्त झाले असून महापलिकेकडून सोयी-सुविधा न मिळता मैदानात किंवा रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या उद्योजकांवर अरेरावी करत दंड वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे उद्योजकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पालिका आयुक्ताची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनियमित घंटागाडी आणि कचऱ्याची सोय कशी लावावी याबाबत उद्योजकांना प्रश्न पडला आहे. दुसरीकडे अधिकारी दादागिरी करत आहेत. दंड न भरल्यास पाच पट दंड भरावा लागेल अशी धमकी देत आहेत. यामुळे उद्योजकांनी मनपाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.