Amazon

नाशिक: तांत्रिक कारणामुळे काही रेल्वे गाड्या रद्द

नाशिक (प्रतिनिधी):  रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणास्तव काही रेल्वे गाड्या रद्द केल्या असून काही रेल्वेचे मार्ग वळविण्यात आले आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांनी आपली होणारी गैरसोय टाळून सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

रेल्वे गाडी क्र. ०१०२७ दादर-गोरखपूर विशेष: २२, २३ आणि २५ फेब्रुवारी, रेल्वे क्र. ०१०२८ गोरखपूर-दादर विशेष २४, २५ आणि २७ फेब्रुवारी, रेल्वे क्र. ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा एक्स्प्रेस २२ आणि २५ फेब्रुवारी, रेल्वे क्र. ११०६० छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २४ आणि २७ फेब्रुवारी, रेल्वे क्र. १९०४५ सूरत-छपरा एक्स्प्रेस २३,२४ आणि २६ फेब्रुवारी, रेल्वे क्र. १९०४६ छपरा-सुरत एक्स्प्रेस २५, २६ आणि २८ फेब्रुवारी, रेल्वे क्र. ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस २५, २६, २७फेब्रुवारी, रेल्वे क्र. ०१०२५ दादर-बलिया विशेष २६, २८ फेब्रुवारी, रेल्वे क्र. २०९६१ उधना-बनारस एक्स्प्रेस २५ फेब्रुवारी, रेल्वे क्र. २०९६२ बनारस-उधना एक्स्प्रेस २६ फेब्रुवारी, रेल्वे क्र. ११०८१ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर २६ फेब्रुवारी, रेल्वे क्र. ११०८२ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस २८ फेब्रुवारी रोजीची रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या सूत्रांनी केले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आधाराश्रमातील बालकाला मिळाले परदेशी दाम्पत्याचे मायेचे छत्र !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790