Amazon

नाशिक: एमडी विक्री करणाऱ्यास अटक; ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !

नाशिक (प्रतिनिधी): एमडी विक्री करणाऱ्या इसमास अंमली पदार्थ विरोधी पथकाने पंचवटी भागात अटक केली आहे. त्याच्याकडून ४२, ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित सागर संजय पाटील (वय: ३१, रा. गजानन पार्क कॉलनी, जत्रा हॉटेलजवळ, आडगाव शिवार) हा इसम एमडी विक्री करण्यासाठी पंचवटीतील त्रिकोणी बंगल्याकडे जाणाऱ्या म्हाडा बिल्डिंगजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचला. सदर संशयित येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडून एकूण ८. ५ ग्राम वजनाचा मेफेड्रोन म्हणजेच एमडी तसेच मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड बसस्थानक तीन महिने बंद; सिटीलिंकच्या बसमार्गांत महत्वाचे बदल

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक: सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक: रंजन बेंडाळे, संजय ताजणे, मंगला जगताप, पोलीस हवालदार: बळवंत कोल्हे, भारत डंबाळे, पोलीस अंमलदार: गणेश वडजे, अनिरूध्द येवले, अविनाश फुलपगारे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, (सर्व नेमणूक: अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर) यांनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790