नाशिक: मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी घोटी पोलिसांनी मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी येथील शाळेत सहावीच्या वर्गात शिकत असून तिला वर्गशिक्षक गोरख जोशी याने मुख्याध्यापक तुकाराम साबळेच्या घरी पाठवले. यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तिच्या घरी पाठवून दिले. यानंतर अल्पवयीन मुलीला घरी आल्यानंतर त्रास होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले.

🔎 हे वाचलं का?:  श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध- छगन भुजबळ

दरम्यान, यावेळी कुटुंबियांनी मुलीला विचारले असता पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ घोटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर घोटी पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवत संशयित मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी यांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790