LPG

नाशिक: राज्यपालांचा दौरा; ‘या’ भागातील वाहतूक मार्गात बदल…

नाशिक (प्रतिनिधी): राज्यपाल सी.के. पी. राधाकृष्णन हे शुक्रवारी (दि.७) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्रजीवन पुरस्काराचे वितरण व सायंकाळी गोदाआरती होणार आहे.

त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत रामकुंडाकडे जाणारी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ असणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ४० किलो गांजाप्रकरणी दोघांना १० वर्षांची सक्तमजुरी

राज्यपालांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि दोन्ही प्रमुख कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होणार असल्याने पोलिस आयुक्तालयायह वाहतूक विभागाने बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त संदीप मिटके, पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोडाऊनमधील ४.५ लाखांच्या वायर चोरीचा उलगडा; दोघे जेरबंद !

येथून वाहनांना नो-एंट्री:
👉 ढिकले वाचनालय ते रामकुंड या दुतर्फा मार्गावर ‘प्रवेश बंद’
👉 मालेगांव स्टॅण्ड ते रामकुंड या मार्गावरही ‘प्रवेश बंद’
👉 सरदार चौक ते रामकुंड हा मार्गही वाहतूकीस बंद
👉 वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790