नाशिक (प्रतिनिधी): शंभर दिवसांच्या कृती आरखड्यातंर्गत बुधवारपासून (दि. ५) पोलिस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पोलिस आयुक्तालयातील १३ पोलिस ठाण्यात अधिकारी नागरिकांच्या भेटीला जाऊन तक्रारी जाणून घेणार आहे. त्याचे जागेवर निरसन केले जाणार आहे. हा उपक्रम दर बुधवारी राबविला जाणार आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिकः पवन नगर पोलिस चौकी, उपायुक्त मोनिका राऊत राजराजेश्वरी मंगल कार्यालय जेलरोड, चंद्रकांत खांडवी: सप्तशृंगी मंदिर अशोकनगर सातपूर, सहायक आयुक्त पद्मजा बढे: कोणार्कनगर आडगाव, नितीन जाधव सराफ बाजार, शेखर देशमुख: वडाळा गाव, सचिन बारी: मखमलाबाद संदीप मिटके: जुने बस स्थानक देवळाली कॅम्प, संगीता निकम: कॉलेज रोड पोलिस चौकी, सुधाकर सुरवाडकर विनयनगर चौकी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण: जेतवनगर चर्च (बिटको पोलीस चौकी), इरफान शेख: चुंचाळे घरकुल योजना.