संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार…

नाशिक (प्रतिनिधी): मनपाचे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 के.व्ही. सातपुर व महिंद्रा या दोन फिडरवरुन 33 के.व्ही. एच. टी. वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या पंपिंगद्वारे मनपाचे बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ. वॉटरचा पुरवठा करण्यात येतो.

तसेच मनपाचे मुकणे रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्‍ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी 33 के. व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे M/S. JWIL Infra ltd, नवी दिल्ली यांच्या मार्फत नविन बीपीटीचे काम चालु असुन या कामात अडचणीच्या ठरणा-या 33 के. व्ही ओव्हर हेड एच.टी. लाईनची महावितरण कंपनीच्या उपस्थितीत शिफ्टींग करणे व त्या अनुषंगाने सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युत विषयक कामे व इतर संबंधित कामे.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युत विषयक कामे व इतर संबंधित कामे. विविध जलशुध्दीकरण केंद्र येथील सबस्टेशनमधील कामे व स्मार्ट सिटी अंतर्गत शट डाऊन अंतर्गत फ्लो मीटर बसविणे व विविध कामे इ. मनपातर्फे नियोजित आहेत.

त्यामुळे गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन सदर कालावधीत पंपिंग करता येणार नसल्याने दरम्यान मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे दि.1/2/2025 रोजी संपुर्ण दिवस नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शनिवार दि. 1/2/2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात येणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

तसेच रविवार दि. 2/2/2025 रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असून याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन  नाशिक महापालिकेतर्फे तर्फे करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here