नाशिक (प्रतिनिधी): राज्यात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. पण सरासरीपेक्षा थंडी कमी आहे. राज्यातील तापमान पुन्हा कमी होणार असल्याने थंडी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात आकाश निरभ्र असून किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतात देखील थंडीचं प्रमाण कमी – जास्त होत आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरचं निच्चांकी तापमान ६.१ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. राजस्थान आणि आजुबाजूच्या परिसरामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. वायव्य भारतामध्ये १४५ नॉट्स वेगाने वारे वाहत आहेत. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीमध्ये चढ – उतार जाणवत आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये थंडी वाढली आहे. काही ठिकाणी सकाळी हवेत गारवा जाणवतो, मात्र दुपारी कडक ऊन असते. राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमान वाढलं आहे.
राज्यात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. गेले काही दिवस पहाटे धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. गुरुवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात सर्वात कमी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तापमान ९.९ अंश तापमान नोंदविले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमान १० ते १९ अंशांच्या दरम्यान आहे. निफाडमधील गहू संशोधन केंद्रामध्ये 11 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी वाढलेलं तापमान थोडं कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. वायव्य भारतात १३५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रावातांमुळे थंडी कमी-अधिक होत आहे. गुरुवारी (ता. २३) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मुंबईत किमान तापमान १९अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस असेल, असा अंदाज आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २२ अंश सेल्सिअस इतकं असेल. देशात जम्मू – काश्मीरमध्ये सगळ्यात कमी किमान तापमान असेल इथे ०७ अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे. तर कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस असेल, असा अंदाज आहे.
![]()


