नाशिक: सराफ पिता-पुत्राच्या आत्महत्येप्रकरणी दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा

नाशिक (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील जागा डेव्हलपमेंटसाठी दिलेले कोट्यवधी रुपये दोघा व्यापाऱ्यांनी परत न करता आर्थिक फसवणूक केल्याने कर्जबाजारी झालेल्या सराफा व्यावसायिक गुरव पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आठवडाभरापूर्वी घडली होती. या प्रकरणी सोलापूरमधील व्यापारी संशयित अमोल सुरेश यादव आणि मोहन सचदेव यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

नाशिकच्या सराफ बाजारातील ए. एस. गुरव अ‍ॅण्ड सन्स सराफ दुकानाचे संचालक प्रशांत आत्मारामशेठ गुरव (४९) व मुलगा अभिषेक प्रशांत गुरव (२८) यांनी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गेल्या सोमवारी रामराज्य संकुल इमारतीत घडली होती. गुरव यांच्या पत्नी देवदर्शनासाठी बाहेर गेलेल्या असताना त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत ओळखीच्या नागरिकांना संदेश पाठविले होते. तसेच मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून गुरव यांनी ती घरातील कपाटाच्या ‘लॉकर’ मध्ये ठेवली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली होती. चिठ्ठीत सोलापूर येथील अमोल सुरेश यादव व मोहन सचदेव यांच्याशी झालेल्या व्यवहाराबाबत मजकूर आहे. या प्रकरणी प्रशांत गुरव यांच्या पत्नी फिर्यादी वनिता गुरव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी:
यादव व सचदेव यांच्याशी झालेल्या ओळखीतून गुरव यांचा मुलगा अभिषेक इंजिनीअर असल्याने सोलापूरमध्ये जमीन विकसनासाठी घेतली होती. दोघा व्यापाऱ्यांकडून अंदाजे १७ कोटी रुपये घेणे होते. रक्कम वेळेत मिळत नसल्याने २०२१ साली सोलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्यवहाराचे पैसे मिळतील या अपेक्षेने गुरव यांनी नाशिकला काही व्यवहार केले होते. त्यातून ते कर्जबाजारी झाले होते. व्यापाऱ्यांकडे अडकलेले पैसे वेळेत मिळत नसल्याने कर्जबाजारी होऊन आलेल्या नैराश्यातून गुरव पिता-पुत्राने जीवन संपविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790