नाशिक: आठ वर्षीय दिव्यांग बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून खून

नाशिक (प्रतिनिधी): येथील गंधर्वनगरी भागात एका गृहप्रकल्पाच्या ठिकाणी राहणाऱ्या एका मजुराच्या आठ वर्षीय मूकबधिर मुलावर अज्ञातांनी अनैसर्गिकरीत्या अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २०) उघडकीस आली. पोलिसांची तीन पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

गंधर्वनगरीमध्ये एक सहा मजली इमारत निर्माणाधीन आहे. रविवारी या इमारतीत बांधकामासाठी पुरुष व महिला मिळून जवळपास पंधरापेक्षा जास्त जण होते. तसेच इमारतीत पाच मजुरांचे कुटुंबदेखील वास्तव्यास आहेत. मागील अडीच-तीन वर्षांपासून गंधर्वनगरीतील या ठिकाणी परजिल्ह्यातून आलेले कुटुंब वास्तव्यास आहेत. दरम्यान, त्यांच्या मुलगा रविवारी सायंकाळी अचानकपणे तेथून बेपत्ता झाला होता.

हे ही वाचा:  नाशिक: महिला तक्रार निवारण समिती २६ जानेवारीपर्यंत गठीत करावी: जिल्हाधिकारी

त्याची श्रवणशक्ती कमकुवत व बोलताही येत नसल्याने कुटुंबियांनी सर्वत्र शोध सुरू केला असता रात्रीच्या सुमारास या सहा मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका ‘डग’मध्ये तो बेशुद्धावस्थेत मिळून आला. त्याच्या वडिलांनी तातडीने त्यास जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मुलाला मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी पोलिसांकडून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हे ही वाचा:  नाशिक: 'पोलिस आपल्या दारी' उपक्रमात उद्या (दि. २२) ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद

त्या इमारतीत काम करणारे सर्व मजूर, कारागीर, महिला मजुरांची उपनगर पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तसेच कोणी पुरुष मजूर अचानकपणे रविवारनंतर याठिकाणाहून गायब झाला आहे का? याचाही तपास पोलिस यंत्रणा करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790