नाशिक (प्रतिनिधी): सुभाष भारती मठ येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने आलेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून शिताफीने पकडून त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
नाशिक रोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी गोकुळ कासार यांना सराईत गुन्हेगार अनिकेत जॉन ऊर्फ केरला याच्याकडे गावठी कट्टा असून, तो सुभाष रोड भारती मठ परिसरात येणार असल्याची पक्की खबर मिळाली. सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना याबाबत माहिती देण्यात आली.
त्यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार व कर्मचाऱ्यांनी भारती मठ परिसरात शनिवारी सकाळनंतर सापळा रचला.
पोलिसांना बघून अनिकेत जॉन केरला हा पळून जात असताना पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ३१ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा मिळून आला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()


