नाशिक (प्रतिनिधी): नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा ३१ डिसेंबरला शासनाने पहाटे ५ वाजेपर्यंत सेलिब्रेशनसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे शहरात ६० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीत ५५ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना रात्रभर पोलिस ठाण्यातच ठेवले तर ४० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह २५०० पोलिस कर्मचारी, गृहरक्षकदलाचे जवान ३१ डिसेंबरला सायंकाळपासूनच रस्त्यावर उतरले होते. कॉलेजरोड, गंगापूररोड, आंनदवल्ली, सिटी सेंटर मॉल चौक, त्र्यंबकनाका, गोविंदनगर बोगदा, राणेनगर, पाथर्डी फाट्यासह ६० ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. शहरात ७३ ठिकाणी स्टॉप अॅण्ड सर्च ऑपरेशनमध्ये वाहनांची तपासणी करण्यात आली असून सराईत गुन्हेगारांचीही शोधमोहीम राबविण्यात आली.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790