नाशिक: त्र्यंबकेश्वरला ५ जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन सुविधा बंद

नाशिक (प्रतिनिधी): नाताळच्या आलेल्या सुट्या तसेच नवीन वर्षामुळे दर्शनासाठी देशभरातून हजारोच्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी येत आहेत. या दरम्यानच्या काळात व्हीआयपी व्यक्तीदेखील दर्शनासाठी येत असतात.

यामुळे त्यांची दर्शनाची सोय करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. याच पार्श्वभूमीवर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ५ जानेवारी २०२५ पर्यंत अति महत्त्वाच्या व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची व्हीआयपी दर्शनसुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी केंद्रीय वा राज्यस्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राजशिष्टाचारासंबंधी लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त सर्व प्रकारची व्हीआयपी दर्शनसेवा ५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790