महत्वाची बातमी: नाशिक शहरातील ‘या’ भागांत उद्या (दि. २८) पाणीपुरवठा बंद राहणार…

नाशिक (प्रतिनिधी): मुकणे धरणावरील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार असल्यामुळे शनिवारी (दि. २८) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मुकणे धरण थेट पाइपलाइनद्वारे सिडको, पाथर्डी, इंदिरानगर, वडाळारोड तसेच नाशिक पूर्व विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: 'स्वर सावाना'चे शनिवारी (दि. १९ एप्रिल) आयोजन

रविवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान महावितरणच्या शटडाउनमुळे मनपाचे मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे सिडकोतील काही भाग व नाशिक पूर्व विभागातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: तपोवन परिसरातील प्लायवूडच्या गोदामाला भीषण आग

हा भाग होणार प्रभावित:
👉
नविन नाशिक: प्र.क्र. 22, प्र.क्र. 24, प्र.क्र. 25, प्र.क्र. 26, प्र.क्र. 27, प्र.क्र. 28, प्र.क्र. 29, प्र.क्र. 31
👉 नाशिकरोड: प्रभाग क्र. 22 मधील वडनेर गेट, पंपीग पर्यंत, व रेंज रोड परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
👉 नाशिक पूर्व विभाग: प्रभाग क्र. 14, प्र.क्र. 23, प्र.क्र. 30

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790