नाशिक (प्रतिनिधी): नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयिताला म्हसरुळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३६ हजारांचा मांजा जप्त केला. पथकाने मखमलाबाद येथे ही कारवाई केली. संकेत गोरख येलमामे (वय: २३, रा. क्रांतीनगर) असे संशयिताचे नाव आहे.
अंमलदार योगेश रास्कर यांना माहिती मिळाली. एकजण नायलॉन मांजा विक्री करत आहे. पथकाने मखमलाबाद गावातील एका मार्टजवळ सापळा रचला. संशयिताकडे पिशवी दिसून आली. त्याची चौकशी केली असता संशयिताकडे चायना निर्मित ३६ हजार रुपये किमतीचे ६० गट्टू मांजा आढळून आले. उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (पंचवटी विभाग) पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षिरसागर, दिपक पटारे, पोलीस हवालदार देवराम चव्हाण, प्रशांत वालझाडे, सतिष वसावे, कविश्वर खराटे, पोलीस अंमलदार प्रशांत देवरे, पंकज चव्हाण, पंकज महाले, योगेश सस्कर, जितेंद्र शिंदे, गुणवंत गायकवाड, महिला पोलीस अंमलदार राजश्री दिघोळे या पथकाने केली.