एकाही पात्र बहिणीच्या खात्यावर…, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली मोठी माहिती

मुंबई (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत देण्यात येणारी मदत यापुढेही सुरू राहणार असल्याचं सांगितलंय. आतापर्यंत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्त्यात पैसे जमा करण्यात आले असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

आत्ताच्या पुरवणी मागण्यात १४०० कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरु केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देतोय. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखांपेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलेला आहे. त्या दिशेनंच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करायचं आहे. विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्र्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचं भक्कम पाठबळ आम्हाला होतं आणि यापुढेही राहिल याची मला खात्री आहे. आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790