नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने एका दुचाकीचोराला हिरावाडी परिसरात बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयित आकाश उत्तम गरड (२९, रा. हिरावाडी) असे दुचाकीचोराचे नाव आहे.
यावेळी अंमलदार दीपक नाईक, महेश नांदुर्डीकर, वैभव परदेशी यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश हा एका दुचाकीवर संशयास्पदरीत्या हालचाली करत बसलेला आढळला. पोलिसांनी त्यास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने रामकुंड येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कसून चौकशी केली असता आकाशने आतापर्यंत पंचवटीमधून तीन, त्र्यंबकेश्वरमधून एक अशा चार दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या सात मोटारसायकली जप्त केल्या.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


