नाशिक (प्रतिनिधी): तरुणीला लग्नाचे व नवीन घर घेण्याचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या चंद्रपूर येथील तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित आरोपी धवल धीरज उपाध्याय (रा. चंद्रपूर) याने पीडित तरुणीस दि. ७ सप्टेंबर ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुणे, तसेच नाशिक येथील लॉजवर आणि पीडितेच्या घरी लग्नाचे व नवीन घर घेऊन देण्याचे आमिष दाखवीत व धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध व संमतीविना पीडितेशी जबरदस्तीने पुणे तसेच नाशिक येथील लॉजवर शारीरिक संबंध ठेवून तिला दीड महिन्याची गर्भवती केले.
लग्नाबाबत विचारणा केली असता संशयित आरोपीने पीडितेस शिवीगाळ करून तिला व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी धवल उपाध्याय याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ८४६/२०२४)
![]()


