नाशिक (प्रतिनिधी): देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त 25 डिसेंबर हा दिवस दरवर्षी सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
सुशासन सप्ताहाचा एक भाग म्हणून प्रशासन गांव की ओर अभियान राबविण्यात येत असून ‘प्रशासन गांव की ओर’ अभियानात सर्व शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेवून नागरिकांना पारदर्शक व तत्पर सेवा वितरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलवळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे
या सप्ताहात प्रशासनाच्या नवनवीन संकल्पना व उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सार्वजनिक तक्रारींचे निवारण तसेच ऑनलाईन सेवा व सेवा वितरण अर्जाचा निफटारा करण्यात येणार आहे. 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत जिल्ह्याच्या विविध विभागांच्या नवीन संकल्पना व उपक्रमांचे सादरीकरण केले जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
![]()


