नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील महाविद्यायांमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गतचे अर्ज महाविद्यालय स्तरावरून सहाय्यक संचालक, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, नाशिक कार्यालय स्तरावर महाडिबीटी पोर्टलद्वारे तात्काळ सादर करावेत, असे आवाहन इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, नाशिक चे सहाय्यक संचालक योगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग निर्माण करण्यात आला आहे. याअंतर्गत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नाशिक कार्यालय हे नोव्हेंबर 2023 पासून नव्याने कार्यान्वित झाले आहे.
ज्या महाविद्यालयांचे भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे मागील अन्वेषण प्रस्ताव मंजूर होणे बाकी आहे, अशा महाविद्यालयांनी सदरचे प्रस्ताव 24 डिसेंबर 2024 पर्यंत सहाय्यक संचालक, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण,नाशिक कार्यालयात सादर करावेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
![]()


