नाशिक (प्रतिनिधी): मोपेड गाडी चोरी करून या वाहनांचा रंग बदलून विक्री करणाऱ्या सिद्धांत किसन सपकाळे (वय: २०, रा. समता नगर) व मोईन शाकीर अन्सारी (वय: २४, वडाळा रोड, नाशिक) या दोघांना पालिसांनी सातपूरला अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ मोपेड दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड गस्तीवर असताना संशयित दोघे महिंद्रा सर्कल, सातपूर येथील एका डेन्टींग, पेंटिंग वर्कशॉपमध्ये दुचाकी घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. अन्सारीच्या चौकशीत त्याने सपकाळे हा चोरीच्या दुचाकी गॅरेजमध्ये आणून
त्यांना डेन्टींग, पेंटिंग करण्याकरिता देत होता. दुचाकींचा रंग बदलून विक्री करत असल्याचे सांगितले. पथकाने संशयित सपकाळेची कसून चौकशी केल्यानंतर त्याने शहर व परिसरातून नऊ मोपेड गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. संशयिताकडून पंचवटी दोन, भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली.
![]()


