नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाक्यापासून जवळच असलेल्या विनयनगरात कुटुंबातील ज्येष्ठ महिला स्वाध्यायासाठी घराबाहेर पडताच चोरट्याने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून सात लाखांचा ऐवज लंपास केला.
सोसायटीत शिरलेला चोरटा अवघ्या दहा मिनिटात आपला हात साफ करून पुन्हा सोसायटीतून बाहेर पडला. ही घटना गुरुवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजता घडली. फिर्यादी वैभव भारत गाडेकर व त्यांचे वडील सुरक्षारक्षक आहे. पोलिसांनी श्वानपथकाद्वारे चोरट्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला, मात्र श्वान सोसायटीजवळच घुटमळला. वैभव गाडेकर (३७) व त्यांचे वडील कामावर गेले होते. तर वैभव यांची आई घराजवळ स्वाध्यायासाठी गेल्या होत्या.
त्याचवेळी चोरटा कडी-कोयंडा तोडून घरात शिरला. चार लाख रुपये रोख तसेच सोन्याच्या दोन वाट्या असलेले मंगळसूत्र, सोन्याचे बिस्कीट, दोन जोड सोन्याचे झुबे, दोन वाट्या, चांदीचे जोडवे असा एकूण सात लाख १० हजारांचा ऐवज चोरीस गेला.
![]()


