नाशिक (प्रतिनिधी): उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे हिमवर्षाव होत आहे. तसेच वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे मध्य प्रदेशापर्यंत थंडीची लाट असून त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका आहे.
मंगळवारी राज्यात धुळ्यात नीचांकी ४.० अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये ९.४ अंश सेल्सियस तापमान होते. आगामी तीन दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात थंडीची लाट तीव्र होणार असून राज्यात १८ डिसेंबरपर्यंत थंडीचा कडाका रहाणार आहे. काही ठिकाणी दवबिंदू गोठण्याची (भू-स्फटिकीकरण) शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. सातपुड्याच्या कुशीत अतिदुर्गम भागात वसलेल्या डाब गावात (ता. अक्कलकुवा) मंगळवारी दवबिंदू गोठल्याने शेत शिवारात बर्फाची चादर पसरली होती.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790