
नाशिक (प्रतिनिधी): अशोकामार्ग येथे अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्ज विक्रीच्या गुन्ह्यात अजय रायकर, मोसीन शेख, अल्ताफ शहा (तिघे रा. म्हाडा, वडाळागाव) आणि आकर्षण श्रीश्रीमाळ रा. तलाठी कॉलनी, तारवाला नगर) यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून सडे ३ लाख रुपये किमतीचे ६१.५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. चौघांवर यापूर्वीच इंदिरानगर, भद्रकाली, मुंबईनाका पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अशोकामार्ग येथे ड्रग्ज विक्रीसाठी काही जण येणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेताच एमडी ड्रग्जची पाकिटे मिळून आली. संशयितांना न्यायालयाने सोमवार (दि.९) पर्यंत पोलिस कोठडीत दिली आहे. पथकाने आधी संशयित दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने आकर्षण श्रीश्रीमाळ याच्याकडून ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. पथकाने श्रीश्रीमाळ याला राहत्या घरून ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (गुन्हे शाखा) पोलिस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहायक पोलीस उप निरीक्षक: रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, पोलीस हवालदार बळवंत कोल्हे, पोलीस अंमलदार: अनिरूध्द येवले, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड यांनी केली.
![]()


