नाशिक (प्रतिनिधी): सामनगाव रोड कॉर्नरवर असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला धारदार कोयत्याचा धाक दाखवून दोन वाहनांमध्ये पेट्रोल भरून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला.
दर्शन भालेराव, भूषण जाधव, बंटी पाटील, राहुल तेलोरे अशी संशयितांची नावे आहेत. मोईन मन्सुर शेख (रा. रजा अपार्टमेंट, चौक मंडई) याच्या फिर्यादीनुसार, साक्षी पेट्रोल पंप येथे कामावर असताना पहाटेच्या सुमारास दर्शन व भूषण दुचाकीवर (एमएच १५ एफएस ३२०३) व राहुल तेलोरे, बंटी पाटील हे मोपेडवर (एमएच १५ जीक्यु ०१८६) आले आणि त्यांनी दोन्ही वाहनात पेट्रोल भरले. शेख याने पैसे मागितले असता संशयितांनी त्यांच्याकडील कोयताचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६४७/२०२४)
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


