नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने यंत्रणांनी आरखडा सादर करतांना आवश्यक सर्व बाबींचा आराखड्यात समावेश करावा व परस्पर समन्वयातून सुक्ष नियोजन करावे, अशा सूचना अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा साप्ताहिक बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिाता झगडे, प्रदीप चौधरी, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी सुधारीत 522 कोटींचा सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे सादरीकरण केले. सिंहस्थ कालावधीतील नाशिक शहर, श्री क्षेत्र कावनई, सर्वतीर्थ टाकेद येथील प्रस्तावित रस्त्यांची कामे, जिल्ह्यातील विश्रामगृह इमारतींची कामे, भाविकांसाठी करावयाच्या सुविधा असा एकूण 40 कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पालवे यांनी केले. यांनतर नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयाचा सिंहस्थ विषयक आराखडा पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी तर महावितरण वितरण विभागाचा आराखडा अधिक्षक अभियंता डी.एच. पडळकर यांनी सादर केला.
![]()


