नाशिक (प्रतिनिधी): शहरात टवाळखोरांचा वाढता वावर आणि मुली, युवती महिलांच्या छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी शहरात स्टॉप अँड सर्च कारवाई सुरु आहे.
२८ ते ३० नोव्हेंबरच्या या तीन दिवसांच्या कालावधीत परिमंडळ १ व २ मधील १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाई १,३२८ टवाळखोरांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
१,३११ वाहने तपासणी करत १ लाख ५८ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सीपी व्हॉट्सअॅपवर टवाळखोर, सोनसाखळी चोरीच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी परिमंडळचे उपआयुक्तांना कारवाईचे आदेश दिले.
पोलिस ठाण्याच्या हद्दीत अचानक स्टॉप अँड सर्च कारवाई करत टवाळखोरांसह ट्रिपल सिट, विना नंबर, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या दुचाकी चालकांना ताब्यात घेत त्यांच्यावर पोलिस ठाण्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.