नाशिक: उत्तरेकडून २० किमी वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी थंडीची लाट; ओझर ६.६

नाशिक (प्रतिनिधी): उत्तर भारतातून ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने थंड वारे वाहत असल्याने राज्यात नाशिक व पुणे जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून शुक्रवारीही (दि. २९) ती कायम राहणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे गुरुवारी (दि. २८) राज्यातील या हंगामातील नीचांकी ६.६ तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडमध्ये पारा ८.८ तर नाशिकमध्ये तो सरासरीपेक्षा ४.२ अंशाने घसरुन १०.५ वर आला होता.

हे ही वाचा:  नाशिक: सातपूर MIDCमध्ये कंपनीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पारा घसरल्याने थंडी अधिक जाणवत आहे कोकणासह मुंबईतही किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी घसरले आहे. नाशिक जिल्ह्यातील ओझर, निफाड, रुई, रानवड, नांदुर्डी, सुकेणे या परिसरात किमान तापमान हे ८ अंशांवर घसरले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790